बुलढाणा जिल्ह्यात अवकाळीचा पावसाचा कहर रबीच्या पिकांचा झाला सुपडा साफ
सिंदखेडराजा प्रतिनिधी -
निसर्गाच्या आवकृपेचा फटका पुन्हा एकदा बुलढाणा जिल्हाला बसला आहे. शुक्रवारी दुपारी झालेला अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील रबीच्या पिकाचा सुपडा साफ झाला. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारी गहू हरभरा पिकाचा नायनाट केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान तज्ञ पंजाब डख यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. हाता तोंडाशी आलेला रब्बी पिकाचा घास या पावसामुळे हिसकून घेतला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने रब्बीतील ज्वारी हरभरा गहू पिकाची निगा केली होती. ज्वारीचे गव्हाचे पीक जोमात आले होते. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीची पीक काढणी सुरू केली होती. तर गाव्हाचे पिक भेडा झाला आहे. तसेच हरभरा देखील काढणीला आलेला असल्यामुळे या पावसाचा फटका हरभरा पिकाला सर्वाधिक बसला आहे. अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यानंतर सोबतच सोसाट्याचा वारा सुटला या वाऱ्यामुळे ज्वारीचे पीक जमीनदोस्त झाले. गव्हाच्या पिकाने माना टाकल्या आणि त्याच्या ओंब्या तुटून जमिनीवर पडलेल्या आहेत. हा पाऊस शुक्रवारी रात्री पुन्हा आल्यामुळे त्या ओंब्या मातीमध्ये मिसळून गेलेल्या आहेत. ज्वारी गहू आणि हरभरा ही शेतकऱ्यांचे रबीतील मुख्य पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठे संकट कोसळले आहे बुलढाणा जिल्ह्यातील रबीचे पीक ९० टक्के वाया गेले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ करून रबी पिकाचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. गहू हरभरा ज्वारीचे पीक वाया गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता अन्नधान्याची पंचायत निर्माण झाली आहे. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील तात्काळ पंचनामे करावीत आणि शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तत्काळ मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख बुलढाणा अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी केले आहे
