*संविधान विरोधी बीटी ऍक्ट १९४९ रद्द करा, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, मलकापूर मध्ये बौद्ध महासभा व वंचितने केले धरणे आंदोलन*
मलकापूर
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार दि. 12 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले
या राज्यव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती व बिहार सरकारला निवेदन देण्यात आले महाबोधी महाविहार मनुवाद्यांच्या तावडीतून मुक्त करून बिहार राज्य सरकारने व केंद्र सरकारने बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्यावे, तसेच संविधान लागू होण्यापूर्वीचा व संविधानाच्या अनुच्छेद १३ प्रमाणे विरोधी असलेला बोधगया टेम्पल अॅक्ट कलम १९४९ चा कायदा रद्द करावा, बुद्धगया येथे बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करावी, बुद्धगया येथे भिकू संघाच्या सनदशीर मार्गाने मागील 26 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनास संपूर्ण देशातून पाठिंबा मिळत असून गावागावात मोर्चे निघत आहेत सरकार हुकूमशाही पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे ते थांबवण्यात यावे, ही मागणी करण्यात आली
या आंदोलनात भा.बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष एस.एस.वले, वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, ता.नेते अजय सावळे, तालुकाध्यक्ष सुशील मोरे, भा.बौ.म.तालुकाध्यक्ष राजू शेगोकार, भंते काश्यप, भंते अश्वजीत, जि संघटक भाऊराव उमाळे, जी.सचिव एम.ओ.सरकटे, ता. सरचिटणीस जी.एन.इंगळे, आर.एम.सूर्यवंशी, मेजर व्ही.एस.गाडेकर, बाबुराव वानखेडे, भीमराव नितोने, प्रताप बिराडे, नारायण जाधव, गणेश सावळे, गजानन झनके, सतीश सावळे, भीमराव ससाने, कैलास बाविसाने, दगडू राणे, दादाराव राणे,महादेवराव तायडे,कडू धुरंधर,दादाराव वानखेडे,के.यु.बावस्कर, अमोल झनके, कुसुम तायडे, कमल इंगळे, सुमन सोनोने, लताबाई झनके, बाळकृष्ण सोनोने, निलेश इंगळे,बबन तायडे, यासीन कुरेशी, जफरखान, शेख सरफराज, अरुण होडघरे, निलेश सोनोने, संजय झनके, सुपडा धुरंदर यांच्यासह शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते

