पाऊस कोसळला, झाडे उन्मळून पडली.
कालखेळ ते मनसगाव मार्गावर अनेक झाडे पडले.
शेगाव प्रतिनिधी : -
काल झालेल्या पावसामुळे आणि वाऱ्याने अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
कालखेड ते मनसगाव दरम्यान अनेक ठिकाणी झाडे पडले आहेत तरी वाहनधारकाने वाहने सांभाळून व नियंत्रित वेगाने चालवावे.
जोरदार सुटलेल्या वादळ वाऱ्यात मनसगाव मार्गावरील परिसरासह रस्त्याने झाडे व झाडाच्या फांद्या उन्मळून पडल्या. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली.

