समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य ऋणानुबंध समाज विकास संस्था करते - आमदार सौं श्वेताताई महाले पाटील 25 जोडप्यांच पालकत्व स्वीकारणारी संस्थे चे कार्य महान - रविकांत तुपकर - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Thursday, 1 June 2023

समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य ऋणानुबंध समाज विकास संस्था करते - आमदार सौं श्वेताताई महाले पाटील 25 जोडप्यांच पालकत्व स्वीकारणारी संस्थे चे कार्य महान - रविकांत तुपकर



 समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य ऋणानुबंध समाज विकास संस्था करते - आमदार सौं श्वेताताई महाले पाटील

25 जोडप्यांच पालकत्व स्वीकारणारी संस्थे चे कार्य महान - रविकांत तुपकर

चिखली प्रतिनिधी   :-  दि.31/05/23

   ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली च्या वतीने तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे 25 नव वर वधू चा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रम चे उदघाट्क म्हणून चिखली विधानसभा च्या आमदार सौं श्वेता ताई महाले पाटील, कार्यक्रम चे अध्यक्ष माजी अध्यक्ष वस्त्र उद्योग महामंडळ मंत्री दर्जा तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर हे होते तर विशेष उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी शंतनू बोन्द्रे, विभागीय महिला अध्यक्ष सौं जोतीताई खेडेकर, मनसे चे जिल्हा अध्यक्ष गणेश बरबडे, बीजेपी चे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर काळे दलित मुक्ती सेने चे भाई विजय गवई वंचित चे नेते अर्जुन बोर्डे राष्ट्रवादी चे विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, शहर अध्यक्ष रवींद्र तोडकर, शिव सेने चे श्रीराम झोरे, प्रीतम गैची, गोदरीचे सरपंच भरत जोगदंडे, माजी सरपंच भोकर भागवत नेवरे, गणेश देशमुख, गायिका सुनीता काकडे, आपली लोकशाही न्यूज चे विजय खरात समाज भूषण उत्तम वानखेडे हे होते. यावेळी ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, बेरोजगार महिला साठी शिवणकाम व पार्लर चे मोफत प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीसाठी मोफत मार्गदर्शन मेळावा, पीडित महिलांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन आणि आज सामूहिक विवाह सोहळ्या चे आयोजन करणारी संस्था हि सामाजिक ऋण फेडण्याचे दायित्व निभावत आहे असे प्रतिपादन चिखली विधानसभा च्या लोकप्रिय आमदार सौं श्वेताताई महाले पाटील यांनी व्यक्त केले.

संस्थेचे मागील सामाजिक कार्य बघता त्यात भर टाकीत 25 नव वर वधू चे पालकत्व स्वीकारून त्याचे सामूहिक विवाह लावून खरे सामाजिक दाईत्व संस्थेने निभावले असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. 

तसेच जे मुलं मुली आपल्या आई वडील यांच्या कडे दुर्लक्ष करित आहे आशा वयोवृद्ध यांची सेवा करणे हे खरे पुण्याचे काम आहे असे मत दलित मुक्ती सेने चे अध्यक्ष भाई विजय गवई यांनी केले.

संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य करणारे प्रशांत डोंगरदिवे यांचा आदर्श समाजातील युवकांनी घाव्या असे विचार वंचित नेते अर्जुन बोर्डे यांनी व्यक्त केले. यावेळी सर्व मान्यवरानी संस्था अध्यक्ष सौं लता अविनाश डोंगरदिवे व संस्थे अंतर्गत सुरु असलेले तुकाराम आश्रय वृद्धाश्रमा चे संचालक व संचलिका प्रशांत डोंगरदिवे रुपाली डोंगरदिवे यांचा सत्कार केला. तसेच वृद्धाश्रमास व संस्थेस सहकार्य करणारे भाई दीपक अवसरमोल यांच्या सह इतरांना संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम चे प्रास्ताविक साहित्यिक लेखक कवी प्रा हि. रा. गवई यांनी केले तर सूत्रसंचाल प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन रुपालीडोंगरदिवे यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी भाई दीपक अवसरमोल, पत्रकार कविवर्य प्रवीणकुमार काकडे, अमोल तायडे, सुमेध जाधव, विरसेन साळवे, दीपक महाले, विजय अंभोरे शरद अवचार संतोष डोंगरदिवे, मनोहर डोंगरदिवे, सिद्धार्थ डोंगरदिवे, भागवत कऱ्हाडे, गोपाल कऱ्हाडे, राजू कऱ्हाडे, वसंता डोंगरदिवे, प्रकाश डोंगरदिवे, उत्तम महाराज डोंगरदिवे, संदेश डोंगरदिवे, 

अमोल डोंगरदिवे, गणेश डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, विकास डोंगरदिवे गौतम डोंगरदिवे राहुल घेवंन्दे, रवींद्र घेवंदे, सचिन डोंगरदिवे, तुषार डोंगरदिवे, योगेश साबळे यांच्यासह शक्यमुनी मित्र मंडळ तसेच समस्त गावकरी भोकर यांनी सामूहिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी अतोनात सहकार्य केले.