चिखली-:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलडाणा जिल्ह्याचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष ऍड नाजेर काजी व जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू भारत बोन्द्रे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सामाजिक न्याय विभाग चे जिल्हा अध्यक्ष दिलीप झोटे यांनी चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस चे एकनिष्ठ युवा तडफदार कार्यकर्ते भाई प्रशांतभाऊ डोंगरदिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभाग चिखली तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू भारत बोन्द्रे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार, शहर अध्यक्ष तुषार बोन्द्रे, प्रदेश सरचिटणीस युवा शेखर बोन्द्रे, ओबीसी चे जिल्हा अध्यक्ष सुभाष देव्हाडे, ओबीसी तालुका अध्यक्ष प्रवीण घड्याळे, प्रसाद पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वां व महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विचार समाजातील तळागाळात पोहचविण्याचे व राज्याचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे हात व विचार बळकट करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करील असा आत्मविश्वास नवनियुक्त तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रशांतभाऊ डोंगरदिवे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या नियुक्ती बद्दल व भावी वाटचालीस उपस्थित सर्व मान्यवरानी शुभेच्छा दिल्या.
