तथागत ग्रुप ने केले विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मानित. कौतुकाने हरकल्या ग्रामीण विध्यार्थिनी. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Wednesday, 19 June 2024

तथागत ग्रुप ने केले विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मानित. कौतुकाने हरकल्या ग्रामीण विध्यार्थिनी.



 तथागत ग्रुप ने केले विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मानित.

कौतुकाने हरकल्या ग्रामीण विध्यार्थिनी.


तिरस्काराच्या विषारी वातावरणात पुरस्कार बनतो नवसंजीवनी.......... श्याम भाऊ उमाळकर.....

विशेष बातमी 

बुलढाणा...... विशेष प्रतिनिधी

दि.16/06/2024रोजी मेहकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, अशोका हॉलमध्ये आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण तथा गुणवंत विध्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. पंडित कांबळे साहेब राज्य अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग( रा. कॉ. पा श. प.), या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. श्याम भाऊ उमाळकर  सरचिटणीस कॉ. पा. म. राज्य हे होते.

 प्रमुख उपस्थितांमध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीपदादा गवई, माजी जी.प. सदस्य प्रा.आशिष रहाटे, उबाठा गटाचे युवानेते किशोर गारोळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव, मुख्याध्यापिका सौ. मीनल जोहरे, भीम आर्मीचे सिद्धार्थ वानखेडे, ऍड. संदीप गवई, गोल्डन मॅन भाई दिलीप खरात, पत्रकार सुनील मोरे,अरुणभाऊ डोंगरे, ए. एस.आय. कोरडे साहेब, प्रकाश सुखदाणे, गजानन सावंत, डॉ. विकी सावंत, युनूस पटेल, दैनिक सेवाशक्ती टाइमचे वृत्त संपादक गजानन सरकटे, दैनिक मेहकर टाईमचे वृत्त संपादक विशाल फितवे उपस्थित होते.

 सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन  करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 प्रमुख अतिथींच्या स्वागत, सत्कारानंतर विशाल फितवे यांनी प्रास्तविक सादर केले.

 त्यानंतर वर्ग 10 मध्ये प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गोरगरीब, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पार्थ बळी, पूजा वाघमारे, पल्लवी तुरुकमाने, रोहित अवसरमोल, शिवानी भानुदास गवई, मारिया परविन शेख हरून, वैष्णवी श्री किसन इंगळे, साक्षी दिलीप ढोणे, पुनम भास्कर काकडे, नेहा उकंडा डोंगरदिवे, उज्वला श्रावण अंभोरे, वैष्णवी दशरथ गायकवाड, नम्रता रामदास जाधव, मयूरी रवींद्र मिसाळ, नम्रता शरद इंगळे, नेहा हिवाळे.

त्यानंतर मुख्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली.

 सुरुवातीलाच गिर्यारोहणाचा जागतिक विक्रम करणाऱ्या चार वर्षीय कु. अन्वी चेतन घाडगे हिला स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तिच्यासोबत आलेल्या तिच्या आईने तिचा  रोमहर्षक प्रवास  कथन केला. त्यानंतर 17लोकांचे जीव वाचवीणारे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार प्रा. डॉ. कृष्णा हावरे यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

सजग पत्रकारिता करून जनतेला न्याय देणारे पत्रकार गजाननभाऊ सरकटे व सुनीलभाऊ मोरे यांना सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर भाई कैलास सुखधाने, अर्जुनदादा गवई, भाई दिलीप खरात, रविकुमार कांबळे, प्रकाशभाऊ पचेरवाल, मोहन सुरडकर, हसनभाई गवळी, आरतीताई इंगळे, मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश शिंगटे साहेब, भास्कर गुरचाल यांना भीमरत्न, राजा शिवछत्रपती महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य करणारे वृत्तसंपादक विशाल फितवे यांना तर अख्तरभाई कुरेशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर सौ मीनल जोहरे यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत आपली भूमिका मांडली.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात भाई कैलास सुखधाने यांनी विविध उदाहरण देत आजचे तिरस्कारयुक्त वातावरण विशद केले.

प्रा. आशिष रहाटे यांनी यशस्वी मुलांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

सत्काराला उत्तर देतांना डॉ. कृष्णा हावरे यांनी अनेक चित्तथरारक प्रसंग सांगतांना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.

आपल्या अनुभवसंपन्न भाषणात काँग्रेसचे सरचिटणीस श्यामभाऊ यांनी 

फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार सर्वांनी मनात रुजवीला पाहिजे. शिकवणी वर्ग नसतांना अनेक मुलींनी मिळविलेले खरंच प्रेरणादायी आहे असे मत मांडले. 

अध्यक्षीय भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मा.पंडित कांबळे साहेब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत त्यांचा ज्ञानाचा, वाचनाचा विचार रुजविणे काळाची गरज असल्याचे मत मांडले.

या कार्यक्रमाचे बहारदार आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन डॉ. कृष्णा हावरे यांनी तर आभारप्रदर्शन युनूस पटेल यांनी केले.

उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी तथागत ग्रुप व संदीपभाऊ गवई यांचे कौतुक केले.