सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस पदी - कुणाल माने.
मेहकर- मेहकर शहरातील गरिब कुटुंबातील
कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या युवकांने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीमुळे थेट प्रदेशावर उडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग चिटणीस पदी तथागत ग्रुपचे सक्रीय कार्यकर्ते यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पंडीतजी कांबळे यांनी नुकतेच एकापत्राद्वारे नियुक्ती केली आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सुरणर, प्रदेश सरचिटणीस संदिप गवई, लातुर जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, घनःश्याम शिंदे, विवेक साळुंके, राजू कांबळे, नरसिंग गायकवाड, महिला आघाडी ललीताताई मगरे,रोहीणीताई चव्हाण,संघमित्रा एटम,प्रतिभा गवई आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या मान्यतेने व स्वतःहाच्या उपस्थितीत कुणाल माने यांची सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश
चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पक्ष प्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार सर्वदूर नेण्याचा प्रयत्न करावा व महाराष्ट्राच्या विकासात भरीव कार्य करावे. पक्ष संघटना बळकट, मजबुतीने उभी करावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहे. कुणाल माने यांच्या निवडीमुळे मेहकर शहरातील लोकांनमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.