मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! संपूर्ण मंत्रिमंडळाने अत्यानंद व्यक्त केला उपमुख्यमंत्री मा. श्री .देवेंद्रजी फ़डणवीस.
दि .04-10-2024 . मुंबई
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फ़डणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने अत्यानंद व्यक्त केला.
जो विषय इतके वर्ष प्रलंबित होता, त्याला मान्यता दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मा. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे आभार व्यक्त करणारा ठराव करण्यात आला.
3 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरे करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतला.
संपूर्ण महाराष्ट्राचे आणि जगभरातील मराठीजनांचे खूप खूप अभिनंदन!
