मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शिव, शाहु, फुले, आंबेडकर या नावामधुन नांव देण्यात यावे- तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांची मागणी..!! - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 7 February 2025

मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शिव, शाहु, फुले, आंबेडकर या नावामधुन नांव देण्यात यावे- तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांची मागणी..!!

 








मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस शिव, शाहु, फुले, आंबेडकर या नावामधुन नांव देण्यात यावे- तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांची मागणी..!!

मेहकर - दि 07-01-2025

मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकर संस्थेस नामकरण्याबात शासनाच्या धेय धोरण आसुन सदर संस्थेस डॉ.बाबासाहेब आंबेडकर किंवा सावित्री बाई फुले ह्या महापुरुषांच्या नावा व्यतिरीक्त इतर नांव देऊ नये. आसे निवेदन मा. प्राचार्य शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था मेहकर यांना तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई व मेहकर शहरातील जेष्ठ नेते वसंतराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे. निवेदनात आसे नमुद करण्यात आले कि सदर संस्थेस शासनाच्या धेय धोरण आसुन सदर संस्थेस शिव, शाहु, फुले, आंबेडकर, या नावांतुन डाँ. बाबासाहेब आंबेडकर किंवा माता सावित्री बाई फुले ह्या महापुरुषांचे नाव देण्यात यावे. कुठल्याही स्वातंत्र्य सेनाचे नांव देण्यात येऊ नये. कारण मेहकर तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी हे भरभरपुर आहेत. थोर महापुरुषा व्यतिरीक्त कुठले ही नांव देऊ नये.

तसेच त्याबाबत मा. प्राचार्य यांनी वरिष्ठाकडे आमच्या मागणीची दखल घ्यावी व वरिल नाव नमुद केलेले द्यावे. आशी आग्रही मागणी मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. याकरिता निवेदन देण्यात आले.


यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, मेहकर शहरातील जेष्ठ नेते वसंतराव वानखेडे, कुणाल माने, गौतम नरवाडे,रवि मिस्कीन, राधेश्याम खरात तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.