तथागत ग्रुप ने केले विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मानित.......... तिरस्काराच्या विषारी वातावरणात पुरस्कार बनतो नवसंजीवनी.......... भाई कैलास सुखधाने..... बुलढाणा मेहकर- दि.09/03/2025 - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 10 March 2025

तथागत ग्रुप ने केले विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मानित.......... तिरस्काराच्या विषारी वातावरणात पुरस्कार बनतो नवसंजीवनी.......... भाई कैलास सुखधाने..... बुलढाणा मेहकर- दि.09/03/2025

 



तथागत ग्रुप ने केले विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मानित..........



तिरस्काराच्या विषारी वातावरणात पुरस्कार बनतो नवसंजीवनी.......... 

भाई कैलास सुखधाने.....



बुलढाणा मेहकर-

दि.09/03/2025 रोजी मेहकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका, अशोका भवनमध्ये तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना,जिवन दिप अनाथ आश्रम व वृध्दाश्रम तसेच राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांच्या वतीने आयोजित नॅशनल पिपल लिडरशीप अँवार्ड व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण तसेच माजी सैनिक सन्मान सोहळा आणी कतृत्ववांन समाजिक, व राजकीय पुरुष व महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई कैलास सुखधाने या प्रसंगी बोलतांना भाई कैलास सूखधाने म्हणाले आज संपुर्ण महाराष्ट्रात   दूषित वातावरण निर्मान झाले आहे. बीड, परभणी सारख्या घटणा तिरस्काराचे बीज पेरत आहेत. अशा परिस्थितीत तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यातील गूणवंतांना पूरस्कार वितरीत करीत आहेत. हा पूरस्कार आमच्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरत आहे. असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगीतले. या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सौ.आरती सार्थक  दिक्षित ह्या होत्या.

 प्रमुख उपस्थितांमध्ये सोपानराव देबाजे, रफिकभाई कुरेशी, अरुण डोंगरे, रवि मिस्कीन, छोटु गवळी, सुमेर खान, सिद्धार्थ वानखेडे, प्रकाश सुखधाने, गजानन सरकटे, मुख्याध्यापिका सौ. मीनल जोहरे, प्रतिभा गवई, निता पैठणे, कांचन मोरे उपस्थित होते.

 सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व राजमाता माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 प्रमुख अतिथींच्या स्वागत, सत्कारानंतर  तथागत ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी प्रास्तविक सादर केले.

त्यानंतर मुख्य नॅशनल पिपल लिडरशीप अँवार्ड व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर भाई कैलास सुखधाने, सौ.आरती दिक्षित, सोपानराव देबाजे, रफिकभाई कुरेशी, रवि मिस्किन, सुमेर खान, सिद्धार्थ वानखेडे, दिलीप खरात, अरुण डोंगरे, प्रकाश सुखधाने, गजानन सरकटे, छोटु गवळी, रविद्र वाघ, देवानंद वानखेडे, मनोज बागडे,कुणाल माने, सुनिल वनारे, संदिप राऊत, गौतम पैठणे, यांच्या हस्ते नँशनल पिपल लिडरशीप अँवार्ड व राजमाता माँ.जिजाऊ गौरव सन्मान पुरस्कार तसेच साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार हा विविध क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व पुरस्कार कर्त्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे बहारदार आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन युवा नेते युनुसभाई पटेल यांनी तर आभारप्रदर्शन तथागत ग्रुपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कुणाल माने यांनी केले.

उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व संदीपभाऊ गवई यांचे कौतुक केले.