चिखली:- वाढत्या महागाईच्या काळात महीलांच्या हाताला काम नसल्याने हतबल असलेल्या महीलांना घरी बसुन स्वतःचा रोजगार सुरु करुन आपला संसाराला हातभार लावावा अशि प्रत्येक महीलेची ईच्छा असते परंतु प्रशिक्षणा अभावी ते शक्य होत नाही. याची जाणीव ठेवत ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर यांच्या संयुक्त विद्यमानाने भोकर येथील गरजु व शिक्षीत महिलाना स्वरोजगारासाठी शिवणकाम चे दहा दिवसाचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले.
यावेळी उद्दघाटक म्हुणन सौ कुसुम सिध्दार्थ डोंगरदिवे तर अध्यक्ष म्हणुन सौ लता राहुल घेवंदे हया होत्या. तर प्रमुख उपस्थितित सौ स्वाती अनंता डोंगरदिवे, सौ लता रजनिकांत डोंगरदिवे, सौ.कविता अमोल डोंगरदिवे, सौ कावेरी भास्कर डोंगरदिवे, सौ पुजा शरद डोंगरदिवे, प्रशिक्षक सौ किर्ती विनोद डोंगरदिवे हया होत्या.
ऋणानुबंध समाज विकास संस्था व तुकाराम आश्रय वृध्दाश्रमाच्या वतीने महिलांना स्वयरोजगार करण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे यामुळे आपल्या भोकर येथिल महिलांना चांगलाच फायदा होईल तसेच भविष्यात शासकीय यौजनेसाठी प्रमाणपत्राचा फायदा होईल असे प्रतीपादन उद्दघाटक म्हणुन सौ कुसुम सिध्दार्थ डोंगरदिवे यांनी केले. तर विविध कार्यक्रमामुळे भोकर येथे बहुजमहापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसार व महिलांना स्वरोजगारासाठी प्रशिक्षण हे कार्य करत समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य ऋणानुबंध समाज विकास संस्था करीत असे मत सौ लता राहुल घेवंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रुपाली प्रशांत डोंगरदिवे यांनी, सुत्रसंचालन कु. प्रियंका वानखडे तर आभार प्रदर्शन कु. निकीता अनंता पवार यांनी केले. या वेळी वृध्दाश्रमातिल वृध्द महिलांसह पुजा वानखडे, शितल डोंगरदिवे, रोशनी डोंगरदिवे,निर्मला डोंगरदिवे, निकिता डोंगरदिवे, शितल सरोदे, संजिवनी खरात, मंदा डोंगरदिवे, संगिता वानखडे यांच्यासह ईतर महिला व मुली उपस्थीत होत्या.
