राष्ट्रीय समाज पक्षाची, प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते उपस्थितीत बुलढाणा ला यशस्वीरित्या बैठक संपन्न. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 24 February 2023

राष्ट्रीय समाज पक्षाची, प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते उपस्थितीत बुलढाणा ला यशस्वीरित्या बैठक संपन्न.

 राष्ट्रीय समाज पक्षाची, प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते उपस्थितीत बुलढाणा ला यशस्वीरित्या बैठक संपन्न.



 बुलढाणा : दि.२४.०२.२०२३

राष्ट्रीय समाज पक्ष बुलढाणा जिल्हा बैठकीसाठी प्रदेश अध्यक्ष काशीनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले 

     यावेळी बुलढाणा जिल्हा(घाटाच्या खालील तालुके)अध्यक्ष पदी शिवदास सोनोने यांची निवड करण्यात आली, बुलढाणा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदी प्रतिभाताई डोंगरे यांची निवड करण्यात आली, बुलढाण्याच्या लोकसभा अध्यक्ष पदी प्रभाकर डोईफोडे यांची निवड करण्यात आली,   महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी कल्पना खरे, सिंदखेड विधानसभा अध्यक्षपदी कारभारी गायकवाड, सिंदखेड तालुका अध्यक्ष पदी संतोष वनवे यांची नियुक्ती करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी या नवनियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

   या बैठकीचे नियोजन जिल्हा अध्यक्ष अमोल काकड आणि जिल्हा संपर्क प्रमुख अतुल भुसारी यांनी केले.