प्रसूती दरम्यान डॉ. गौरव ठाकरे यांनी केलेल्या हलगर्जिपनामुळे नवविवाहिता मृत्यू प्रकरणी कारवाई करून अटक करा, रि.पा.ई. तालुकाध्यक्ष, विजय भाऊ बोधडे.
खामगाव : दि.२३.०२.२०२३
खामगाव येथिल डॉ. गौरव ठाकरे यांच्या खाजगी दवाखान्यात सौ. रोमा राजेंद्र बुलानी हि महिला प्रसुति करिता दाखल करण्यात आली होती.डॉक्टर यांनी तपासणी करून सिझर करण्याचा सल्ला दिला डॉक्टरच्या सल्ल्यानुसार महिलेच्या पतीने सिझर करण्यास मान्य केले आणि सांगितलेली फिस जमा केली.
दि.०६.०२.२०२३ रोजी डॉ. गौरव ठाकरे यांनी सिझर केले असता प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला होता हे बघून डॉक्टर यांनी आपली चूक झाल्याची लक्षात येताच तसेच त्यांच्याकडून आता ऑपरेशन होऊ शकत नाही व त्यांना ऑपरेशन येत नाही असे सांगून त्यांनी स्वतः जवळचे रुपये 15000 महिलेच्या नातेवाईकांना देऊन तत्काळ अकोला येथील ओझोन हॉस्पिटल येथे रेफर केले घाबरलेल्या पतीने अकोला ओझोन रुग्णालय येथे महिलेला दाखल केले तेथे उपचार सुरू असताना रक्तस्त्राव कमी होत नव्हता अखेर रक्त स्त्रावाणे या महिलेच्या मृत्यू दिनांक 08.2. 2023 रोजी झाला महिलेच्या मृत्यू हा डॉक्टरच्या चुकीमुळे झाला असून महिलेच्या मृत्यूला डॉक्टर ठाकरे हेच जबाबदार आहेत याप्रकरणी चौकशी करून डॉक्टर ठाकरे वर मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करून योग्य कारवाई व्हावी अन्यथा न्यायासाठी आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू अशी तक्रार उपविभागीय अधिकारी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट चे खामगाव तालुका अध्यक्ष विजय भाऊ बोदडे यांनी केली आहे.
