रासप आगामी निवडणुका स्वबळावर लढणार : मा अतुल भाऊ भुसारी पाटील आढावा बैठक : पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 24 March 2023

रासप आगामी निवडणुका स्वबळावर लढणार : मा अतुल भाऊ भुसारी पाटील आढावा बैठक : पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या


रासप आगामी निवडणुका स्वबळावर लढणार : मा अतुल भाऊ भुसारी पाटील

आढावा बैठक : पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या 



  (प्रतिनिधी) :  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  सर्व निवडणुका ह्या राष्ट्रीय समाज पक्ष जिंकण्यासाठीच स्वबळावर लढणार असून निवडणूकांत विजय संपादन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे असे आवाहन राष्ट्रीय समाज बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी आज येथे बोलतांना केले. 


राष्ट्रीय समाज पक्षाची सिंदखेडराजा मतदारसंघात देऊळगाव राजा येथे आढावा बैठक  शुक्रवारी ( ता . २४.३.२०२३) लोकसभा अध्यक्ष प्रभाकर डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  मा.अतुलभाऊ भुसारी पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष लोकसभा प्रभाकर डोईफोडे साहेब विधानसभा अध्यक्ष कारभारी गायकवाड ,युवक महिला जिल्हाध्यक्ष किरण ताई वाघ सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष संतोष वनवे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष भाई दिपक म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या . अतुलभाऊ भुसारी पाटील पुढे म्हणाले, विस्थापितांना संघटीत करून प्रस्थापित करण्यासाठी महादेव जानकर यांनी दीन,दलित, बहुजन, समाजातील होतकरू समाजसेवेत सक्रीय असलेल्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग मिळावा यासाठी चालवलेली चळवळ राज्यात गतिमान करून,पक्ष वाढीसाठी  बुलढाणा जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीवर सुरू असल्याचे अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे न्याय मिळवून देण्यासाठी वाढती महागाई भडका मुळे जनता त्रस्त येणार निवडणुकीत जनता या सरकारला धडा शिकवला शिवाय रहाणार नाही असे पाटील यांनी   स्थानिक प्रश्नांवर जनजागृती करून संघटन वाढवा असे आवाहन अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी  केले. 

  पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.