वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्यातील कृ.ऊ.बा.समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार... जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Sunday, 26 March 2023

वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्यातील कृ.ऊ.बा.समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार... जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे


 वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्यातील कृ.ऊ.बा.समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार... जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे


    खामगाव : प्रतिनिधि -  वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा उत्तर विभागाची दिनांक २५ मार्च रोजी स्थानिक विश्रामगृह खामगाव येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती 

      या बैठकीत सद्यस्थितीत बुलढाणा जिल्ह्यात होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून या निवडणुका कार्यकर्त्यांनी स्वबळावर  लढव्यावात असे पक्ष वरिष्ठांचे आदेश आहेत तरी वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे प्रतिपादन पक्षाचे बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीपजी वानखेडे यांनी केले

      या बैठकीच्या अध्यक्षांनी बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे हे होते तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा प्रभारी प्रदीपजी वानखेडे हे होते तथा विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकर, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, एड. अनिल ईखारे, महिला जिल्हाध्यक्ष विषाखाताई सावंग, युवक जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, माजी जि.प.सदस्य राजाभाऊ भोजने, प्रा.अनिल अमलकार, भीमरावजी तायडे, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, प्रा.राजकुमार सोनेकर,वसंतराव तायडे, विठ्ठल पाटील, नीलकंठ पाटील, मनोहर जाधव,दादाराव शेगोकार,सोपान चोपडे,विजय तायडे यांच्यासह बुलढाणा जिल्हा उत्तर विभागातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

       तसेच आमची तयारी स्वबळावर निवडणूक लढवण्याची असून कोणत्याही पक्षाचा सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यास त्या प्रस्तावाचा पक्षश्रेष्ठी विचार करतील असेही या बैठकीत सुचित करण्यात आले, सोबतच कृ.ऊ. बाजार समितीच्या निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्याकडे अर्ज द्यावे असे आवाहन जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी केले