डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
शेगाव : - दि.१४:०४:२३
भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांची जयंती बुलढाणा जिल्ह्यात , तालुक्यात तसेच शेगाव शहरात उत्साहात साजरी करण्यात आली .
भारतीय बोद्ध महासभा , आम्रपाली बुद्ध विहार समिती , सैनिक कॉलोनी , रेल्वे कॉलोनी , पंचशील नगर , इंदिरा नगर , तीन पुतळा परिसर , नालंदा बुद्ध विहार , संविधान चौक , तीन पुतळा परिसर , तसेच ताड पुरा भागातील मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले .
रेल्वे स्टेशन समोर मिरवणूक मार्गांवर नागरी हक्क सरक्षण समितीच्या वतीने चहा पाण्याचें वितरण करण्यात आले.
मिरवणुकीत सगळ्या वयोगटातिल लोकांनी सहभाग घेतला रेल्वे स्टेशन परिसर पासून अनेक गावातील तसेंच जवडपास असलेल्या गावातील लोकांनी मिरवणूक बघण्या करिता गर्दी केली होती, काही मुलं मोबाईल चा वापर करून आपल्या मित्रांना लाईव्ह मिरवणूक दाखवीत होते.



