वीज पूरवठा वारंवार खड़ीत होत आहे ,लवकरात लवकर शेतकरीवर्गाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा ,
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अतुल भाऊ भुसारी पाटील व शेतकरीवर्ग यांनी दिला आहे
दुसरबीड प्रतिनिधी: १५:०४:२३
दुसरबीड एमएसईबी सबटेशन अंतर्गत येणारे गावे तढेगाव ,बारलींगा, केशवशीवणी, वाकद या गावांचा शेतातील गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून सदर पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन दोन दिवस लागतात व तसेच याकडे सबंधित अधीकारी दुर्लक्ष करीत आहेत त्यांना याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ काढूपणा करतात यामुळे शेतकरीवर्ग व गावातील जनता त्रस्त झालेली असून लाईटच्या अभावी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्न तसेच शेतातील जनावरांचा चारा यासाठी लागनारे पाणी व फळबागला लागणारे पाणी देण्यासाठी लाईटची गरज असून उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतातील फळबागा चारा पीक हे लाईट अभावी सुकत आहे व एकीकडे सबंधित अधीकारी टोलवा टोलवी करत आहेत व मनमानी करत आहेत.
लवकरात लवकर शेतकरीवर्गाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अशी मागणी होत आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अतुल भाऊ भुसारी पाटील व शेतकरीवर्ग यांनी दिला आहे
