डी.एन.जाधव महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी
छत्रपती संभाजीनगर दि.१९/०४/२०२३ :
भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था ०४ मे १९५५ रोजी स्थापन केली. या संस्थेचे सध्या कार्यरत असलेले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संस्थेत काम करणारे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डी.एन.जाधव यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब यांनी घेऊन , त्यांची निवड महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत करून त्यांच्यावर प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी नाशिक येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिनांक २५ मार्च २०२३ या दिवशी टाकली.त्यांना निवडीसंदर्भाचे अधिकृत पत्र दिनांक १९ एप्रिल २०२३ बुधवार या दिवशी महाराष्ट्र प्रदेश महासचिव माननीय राजेशजी मोरे साहेब यांनी औरंगाबाद येथील धम्मरत्न बुद्ध विहारात झालेल्या जिल्हा बैठकीत अधिकृतपणे देऊन त्यांचा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करुन पुढील कार्यासाठी विशेष शुभेच्छा दिल्या . यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, हे विशेष.
