भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब यांचे मानले आभार - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Thursday, 20 April 2023

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब यांचे मानले आभार



 भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब यांचे मानले आभार


छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :  द बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना भारतीय बौद्ध महासभा छत्रपती संभाजीनगर शहरात साकेत बुद्ध विहारात महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले. शहर अध्यक्ष सुनिता गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब यांनी जिल्हाध्यक्ष डी.एन.जाधव  यांची निवड  महाराष्ट्र कार्यकारिणीत करून त्यांच्यावर प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी टाकल्याबद्दल  राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब यांचे जाहीर आभार मानले. यावेळी लताताई वानखेडे, प्रा. मंगला झीने ,प्रा. माया जाधव,ज्योति  दांडगे, अनिता म्हस्के,प्रा. शोभा खरे, अनिता नरवडे, अर्चना गायकवाड या़ंच्यासह बहुसंख्येने महिला पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.  डॉ बाबासाहेब आंबेडकरा़ंचा - विजय असो ,  डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब तुम आगे बढो- हम तुमारे साथ है!अशा घोषणा देण्यात आल्या. भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय धोरणे व  उद्दिष्टे यावर सुनिता गाडेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन  द बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ.राजरत्न आंबेडकर  साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संस्थेत काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. डी.एन.जाधव साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात शाखा गठित करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित  कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या हे विशेष!