वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ग्राम भादोला येथे इप्तार पार्टीचे आयोजन
भदोला प्रतिनिधी : दि. २२/०४/२०२३
ग्राम भादोला तालुका जिल्हा बुलढाणा या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो मुस्लिम तथा इतर बहुजन धर्मीय बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.या पार्टीमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय सतीश भाऊ पवार जिल्हा संघटक माननीय बाला भाऊ राऊत ,जिल्हा महासचिव माननीय अर्जुन भाऊ खरात तसेच भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय अध्यक्ष माननीय आनंथा भाऊ मिसाळ ,माननीय मोहनदादा सरकटे माननीय शेषराव गवई, माननीय संजय गवई, माननीय निकम साहेब यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते .या इप्तार पार्टी दरम्यान माननीय सतीश भाऊ पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व इस्लाम हा मानवतावादी धर्म कसा आहे यावर प्रकाश टाकला.

