आज वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी संवाद मेळावा शेकडो युवक मोठया प्रमाणावर राहतील हजर - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 24 April 2023

आज वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी संवाद मेळावा शेकडो युवक मोठया प्रमाणावर राहतील हजर



 आज वंचित बहुजन आघाडीचा ओबीसी संवाद मेळावा

शेकडो युवक मोठया प्रमाणावर राहतील हजर


खामगाव : - बुलढाणा जिल्हा उत्तर व दक्षिण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ओबीसी मेळाव्याचे आयोजन दि.२५/०४/२०२३ रोजी दुपारी १२ वा. ए एन स इन्फो वेली आय टि आय चांद मारी चौक शेलोडी रोड खामगाव येथे आयोजित केला आहे . या मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ. अनिल अमलकार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य उपाध्यक्ष नगोराव पांचाळ , सोमनाथ साळुंखे , गोविंद दळवी  तर प्रमुख उपस्थिती जिल्हा प्रभारी दक्षिण धैर्यवान फुंडकर , पार्लमेंट बोर्ड सदस्य अशोक भाऊ सोनोने , पश्चिम विदर्भ अध्यक्ष शरद भाऊ वसतकार , सौ. सविता ताई मुंडे , बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप भाऊ वानखडे, जिल्हाध्यक्ष दक्षिण निलेश जाधव , बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे , सौ. विशाखाताई सावंग  तर निमंत्रक म्हणून ऐडवोकेट अनिल इखारे महा सचिव अतिशभाई खराटे , प्रशांत वघोदे , विष्णू उमाळे यांची उपस्थिती लाभणार आहे. 

या मेळाव्यामध्ये ओबीसी संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ओबीसी नागरिकांनी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या  कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

आज कि बात न्यूज़ नेटवर्क टीमची  या सन्दर्भात चर्चा करताना वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा उत्तर व दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी खामगाव येथे "ओबीसी संवाद मेळावा" आयोजित केला असून या मेळाव्यास सर्व पदाधिकाऱ्यांनी व ओबीसी बांधवांनी अवश्य उपस्थित रहावे, ही विनंती अतिशभाई खराटे बुलढाणा जिल्हा महासचिव यांनी केली आहे.