भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादलच्या कार्याध्यक्षपदी
तेजेन्द्रसिंह चव्हाण यांची नियुक्ती
खामगांव प्रतिनिधी : ०७.०४.२०२३
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादलच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी तेजेंद्रसिंह चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्ती लालजी देसाई राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस सेवादल यांनी आपल्या नियुक्ती पत्राद्वारे केली आहे .
तेजेंद्रसिंह चव्हाण हे पहिले पासूनच काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याचे समजते.
त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून थेट प्रदेश कार्यअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवळणुकीत त्यांच्या हातून चांगली सेवा घडो असा विश्वास लालजी देसाई यांनी व्यक्त केला आहे.
नियुक्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे चव्हाण यांनी आपल्या नियुक्तीमुळे खासदार मुकुल वासनिक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नानाभाऊ गावंडे , काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू अवताडे, प्रदेश सचिव संजय राठोड उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी , राहुल बोंद्रे यांचे आभार मानले आहेत.
