जिल्हा ,बुलढाणा, मेहकर तालुक्यातील उसरण येथील महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने शाखेच्या कार्यकारणीची बैठक सपन्न.
मेहकर (बुलढाणा): दि०४.०४.२०२३, मंगळवार रोजी जि.बुलढाणा,मेहकर तालुक्यातील उसरण येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई यांच्या आदेशानुसार व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मा.विजय सरकटे तसेच मेहकर तालुका अध्यक्ष मा.सचिन दादा गवई यांच्या मार्गदर्शनाखाली तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हा व उसरण येथील शाखेच्या कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई,महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यकारी महासचिव मा.गौतम नरवाडे, महाराष्ट्र राज्य संघटक मा.कुणाल माने,महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख मा.राधेशाम खरात,विदर्भ विभाग प्रसिद्धी प्रमुख मा.नितीन भाऊ बोरकर, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.राजकुमार ऊचित,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मा.विजय सरकटे, मेहकर तालुका अध्यक्ष मा.सचिन दादा गवई,मेहकर शहर अध्यक्ष मा.विशालभाऊ बाजड, उसरण येथील नवनिर्वाचित पदाधिकारी सदस्य आणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
