वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ,
मलकापूर येथे अतिशभाई खराटे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे यांच्या नेतृत्वात वैचारिक प्रबोधनात्मक सभा संपन्न
मलकापूर : १४ :०४:२०२३
प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने मलकापूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली
याप्रसंगी स्थानिक मलकापूर रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर "वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम व सभेचे" आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. एस. वले सर हे होते तथा भंते महानाम, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक रत्नपारखी साहेब, वंचितचे जिल्हा संघटक भाऊरावजी उमाळे, तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई नितोने, बहापुरा सरपंच पल्लवी चव्हाण, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राजू शेगोकार, मेजर जनरल एल. सी. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन माल्यार्पन करण्यात आले
यावेळी प्रमुख मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून उपस्थितांना वैचारिक प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले
या सभेचे सूत्रसंचालन जी.एन. इंगळे सर यांनी केले तर आभार गजानन झनके यांनी मानले या कार्यक्रमास विनोद निकम, विलास तायडे, गणेश सावळे, दिलीप वाघ, यासीन कुरेशी, विजय झनके, एम.ओ. सरकटे, एस. बी. निकम, शांताराम सोनोणे, एड. सुबोध इंगळे, कडू धुरंदर,एस बि.सावदेकर,के.यु. बावस्कार, बी.ए.सावळे, बि.आर.दांडगे, बाळकृष्ण सोनवणे, जफर खान, अनिल तायडे, अमोल भगत, प्रवीण इंगळे, विशाल सोनोणे, हरीश भावनानी, बाबुराव वानखेडे, अक्षय इंगळे, किशोर वाघोदे, संजय वानखेडे, पंजाब जगताप यांच्यासह शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते

