जनाबाई सार्वजनिक वाचनालय फक्त कागदावर आणि नावालाच, पाच वर्षा पासून बंद पण अनुदान मात्र सुरु.
मोखा - जनाबाई वाचनालय मागील जवडपास पाच वर्षांपासून बंद आहे आता क ग्रेड वर अनुदान शुरु आहे.
या वाचनालय चे अध्यक्ष श्री.लीलाधर भाऊजी बागडे आहेत आणि सचिव सौ.सुनंदा लीलाधर बागडे आहेत , मागील जवडपास पाच वर्षांपासून फक्त लाभ घेण्याकरिता कागज कारवाई करून अकोला जिल्ह्यातील ग्रन्थालयातिल अधिकारी यांना परस्पर पैसे देऊन आर्थिक व्यवहार तपासणी करून अनुदान घेण्यात येत आहे.
तसेच या सन्स्थेशि संलग्नित असलेली द ग्रेट गजानन महाराज बहुद्देशीय संस्था , डॉ. पंजाबराव देशमुख अभ्यासिका हि सुद्धा बंद आहे हि अभ्यासिका व्यंकटेश नगर , शेगाव ता.जि.बुलढाणाला आहे.
वाचनालय म्हटलं कि बऱ्याच अटी असतात लोकांसाठी शुरु ठेवणे अनिवार्य असते पेपर आणि मासिका ठेवणे अनिवार्य असते सामाजिक कार्यक्रम घेणे अनिवार्य असते पुस्तके ठेवणे अनिवार्य असते पण ऑडिट मध्ये जेवढे पुस्तक दाखवण्यात आले तेवढे पुस्तक हजर नाहीत कोणी ग्रन्थपाल आणि कोणीहि चपराशी सुद्धा हजर नाही फक्त कुलूप लागलेला आहे मात्र दर सहा महिन्यात अनुदान खात्यात जमा होते.
तरी सम्बन्धित विभागाणी त्वरित कारवाही करावी आणि अनुदान बंद करून कारवाही करण्यात यावी .
हा खरं तर अकोला जिल्हा ग्रन्थालयातिल भोंगळ कारभार आहे. जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील किती तरी ग्रन्थालय फक्त कागदावरच आहे.
