31 मे रोजी सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार
चिखली प्रतिनिधी :- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा यामध्यमातून गोर गरीब शेत मजूर व इतर कामगार बांधवांचा लग्न समारंभ वर होणारा व्यर्थ खर्च न करतात राज्य शासनाची आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे दि 31 मे 2023 रोजी दुपारी 2.00 वाजता सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भावी संसररूपी जीवनात पदार्पण करणारे नव वरवधू ना आशीर्वाद देण्यासाठी पुढील मान्यवर उपस्थित राहणार आहे या मध्ये
कार्यक्रम चे उदघाटक आमदार श्वेताताई महाले पाटील अध्यक्ष रविकांत तुपकर शेतकरी नेते तथा अध्यक्ष वस्त्र उदयोग महामंडळ मंत्री दर्जा मार्गदर्शक आमदार संजय गायकवाड बुलडाणा विधानसभा,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष ऍड नाजेर काजी, विशेष उपस्थिती मा. आमदार तथा राष्ट्रवादी नेत्या सौं रेखाताई खेडेकर, गोपाल तुपकर जिल्हा अध्यक्ष पत्रकार संघ,मंगेश पळस्कर,योगेश शर्मा अध्यक्ष चिखली तालुका पत्रकार संघ, युसूफ भाई, अजयकुमार कोठारी अध्यक्ष धनश्री पतसंस्था,शैलेश बाहेती रामदेव एजन्सीज, सौरभ जैन दहिगाव एजन्सी, सुनील लाहोटी जेष्ठ समाजसेवक, मनसे जिल्हा अध्यक्ष गणेश बरबडे, राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी शंतनू बोन्द्रे, संजय गाडेकर, विभागीय महिला अध्यक्ष डॉ सौं ज्योती ताई खेडेकर, वंचित नेते अशोक सिंग सुरडकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर काळे, डॉ प्रतापसिंग राजपूत, पिरिपा चे भाई विजय गवई,राष्ट्रवादी चे गजानन वायाळ संजय खेडेकर रवींद्र तोडकर प्रमोद पाटील शिव सेनाचे प्रीतम गैची श्रीराम झोरे, भरत जोगदंडे सरपंच गोदरी,यांच्या सह इतर हि मान्यवर उपस्थित रहाणार असून तुकाराम आश्रय वृद्धाश्रमास वेळोवेळी मदत व सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या सोहळ्यात अनेक सर्व जातीय नव वधूवर विवाह बंधनात अडकणार आहेत तरी या ऐतीहासिक विवाह सोहळ्याचे साक्षीदार होऊन वधुवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहावे असे आवाहन ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली च्या वतीने करण्यात आले आहे.

