तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य चंद्रपूर ज़िल्हाध्यक्षा कु. शैलिका दयाराम सागवरे यांच्या अध्यक्षतेखाली सेलिब्रिटी मेकअप चे आयोजन. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Tuesday, 30 May 2023

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य चंद्रपूर ज़िल्हाध्यक्षा कु. शैलिका दयाराम सागवरे यांच्या अध्यक्षतेखाली सेलिब्रिटी मेकअप चे आयोजन.


 तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य चंद्रपूर ज़िल्हाध्यक्षा             कु. शैलिका दयाराम सागवरे यांच्या अध्यक्षतेखाली सेलिब्रिटी मेकअप चे आयोजन.

चंद्रपूर प्रतिनिधि -  21/05/23

चंद्रपूर - स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गान्धी सांस्कृतिक सभागृह ' डीएसव्ही मिसेस इंडिया महाराष्ट्र 2023'  'मी सौदर्यवती महाराष्स्ट्राची ' सौंदर्य स्पर्धा रविवार ला 21/5/2023 ला पार पडली प्रत्येक क्षेत्रात चंद्रपूरने आपले वैशिष्ट व श्रेष्ठत्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. या स्पधेत माजी मिसेस इंडिया इंटरनॅशनची श्रीलंकन पेजेंट 2019-20 च्या विजेता अनुरीता ढोलकीया, सोहेल खान तसेच ताई फौंडेशनच्या अद्यक्ष गोमती पाचभाई यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देत कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले. तसेच जगातील कुठल्याही सौदर्य स्पर्धात सुंदर चेहऱ्यामागचे गुण तपासले जातात. दिसायला सुंदर आहे पण अगदी एका प्रश्नाचे उत्तर आले नाही तरीही स्पर्धातून बाद केले जाते. त्यामुडे सुंदर चेहऱ्याला कायम गुणांच्या आणि मनाच्या सौंदर्याची जोड आवश्यक असते. असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सूरज सादमवार, पवन सादमवार आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मिसेस इंडिया सुपर मॉडेल ड्रॉ. झवेरिया, डीएसव्हीं मिसेस ग्रँड इंडिया वैशाली मानमोडे, मिसेस इंडिया 2017 आसमाउपरे यांनी भूमिका बजावली. असलेषा हिने डीएसव्हीं मिसेस इंडिया 2023 चा 'किताब पटकावला. प्रियंका उपविजेता ठरली.'देवो के देव महादेव ' मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहासि धामी यांनी विजेत्यांना क्राऊन प्रदान केला. आतिबा हिने तृतीय, आकांशा चैथे स्थान पटकावले. संगीता कुकडे यांना स्पेशल इन्टेरेस्टेड क्राऊन, डीएसव्हीं मिसेस इंडिया महाराष्ट्र वूमन ऑफ डिगणिती नीना नगरांडे, वूमन ऑफ सबस्तन स्वप्ना राऊत यांना ही सन्मानित केले. सेलिब्रिटी सुहाशी धामी यांचा मेकअप कु. शैलिका दयाराम सागवरे मॅडम आणि लोहित गिलबिले सर यांनी केला. तसेच इतर पार्टीसिपेटचे मेकअप किरण शिंदे मॅडम, कु.शैलिका सागवरे मॅडम, लोहित गिलबिले सर, सीता कोकोडे, उत्कर्षा नगराडे, हर्षाली चिताडे, प्रीती बुराडे, नीलिमा गोहोकर, याचिका भोयर, सोनाली खडसे, रागिणी खतारकर, मनीषा ताले आदिनी खूपच छान मेकअप करून दिलेत. कॅमेरामॅन अंकित राहूत व प्रशिक राहुत हे होते. सगड्यानी अथक परिश्रम घेतले.