शाहुजीनि समतेच राज्य निर्माण करून बहुजणांना न्याय दिला एस एस गवई शाहू जयंती ला गुणवंत विध्यार्थीचा सन्मान - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 26 June 2023

शाहुजीनि समतेच राज्य निर्माण करून बहुजणांना न्याय दिला एस एस गवई शाहू जयंती ला गुणवंत विध्यार्थीचा सन्मान



 शाहुजीनि समतेच राज्य निर्माण करून बहुजणांना न्याय दिला

एस एस गवई

शाहू जयंती ला गुणवंत विध्यार्थीचा सन्मान

चिखली -: करवीर नरेश आरक्षणाचे जनक छत्रपती शाहुजी महाराज याच्या जयंती, सामाजिक न्याय दिन निमित्त ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे भोकर पंचकृषीतील माध्यमिक व उच्चं माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विध्यार्थी यांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सम्मान करून प्रोत्साहीत करण्यात आले.

या कार्यक्रम चे अध्यक्ष सम्राट फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष एस एस गवई हे होते तर प्रमुख मार्गदर्शक संत कबीर पतसंस्था अध्यक्ष प्रताप भांबळे तर प्रमुख उपस्थिती दयानंद निकाळजे, गोदरी चे सरपंच भरत जोगदंडे, पवन चव्हाण,ज्ञानेश्वर जोगदंडे, सतीश अहिर हे होते.

शाहूजी महाराज यांनी समतेचे राज्य निर्माण करून सर्व बहुजन समाजाला 50% आरक्षण देऊन स्वावलंबी बनवलं असे मत एस एस गवई यांनी व्यक्त केले.

तसेच संस्थेच्या माध्यमातन वृद्धाश्रम, सामूहिक विवाह सोहळा, वधू वर परिचय मेळावे, महापुरुषांचे जयंती पुण्यतिथी यासह गुणवंत विध्यार्थी यांचे सन्मान करून प्रोत्साहन देणे हे संस्थेचे कार्य उल्लेखनीय असे मत प्रताप भांबळे यांनी व्यक्त केले. तसेच संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या वृद्धाश्रमास मदत करण्यासाठी दात्यानी समोर येणे गरजेच आहे असे मत दयानंद निकाळजे यांनी व्यक्त केले. यावेळी भोकर पंचक्रोशीतील गुणवंत विध्यार्थी यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच पवन चव्हाण यांनी वृद्धाश्रमास आर्थिक मदत करून सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी तर रुपाली डोंगरदिवे प्रास्ताविक, आभार प्रदर्शन संदेश डोंगरदिवे यांनी केले. यावेळी प्रकाश डोंगरदिवे, मधुकर डोंगरदिवे, श्याम डोंगरदिवे, उत्तम महाराज डोंगरदिवे, नामदेव डोंगरदिवे, गणेश डोंगरदिवे, भास्कर डोंगरदिवे, भास्कर वानखेडे, भारत डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, किसना डोंगरदिवे, तेजराव डोंगरदिवे, द्वारका घेवंदे, कावेरी डोंगरदिवे, नंदा डोंगरदिवे, चंद्रभागा वानखेडे, लता वानखेडे, बेबी डोंगरदिवे, संगीता वानखेडे, अर्चना डोंगरदिवे यांच्यासह गुणवंत विध्यार्थीचें पालक उपस्थित होते.