नांदेड बाेंढारी गावातील अक्षय भालेराव बाबत त्यांच्या मृत्यूपश्चात सोशलमिडीयात बदनामीकारक मजकूर लिहणाऱ्यांची पोलीस चौकशी करणार !
- ॲड. प्रकाशजी आंबेडकर साहेब
बोंडार प्रतिनिधि- अक्षय भालेरावचा जातीयवादी किड्यांनी अतिशय निर्घृणपणे खून केला. मात्र आज सोशलमिडीयात अक्षय विरोधात चुकीचे बदनामीकारक स्टेटमेंट जातीयवाद्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून व्हायरल केल्या जात आहे. याची नोंद घेण्यात आली आहे. आता काही वेळापुर्वी बोंडार येथे दिवंगत अक्षयच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी उपस्थित कुटुंबीय, गावकरी, कार्यकर्त्यांना संबोधित करताना मा. बाळासाहेबांनी सांगितले की, जे अक्षय बाबत बदनामीकारक मजकुर सोशलमिडीयात लिहीत आहेत त्यांची चौकशी पोलीस जरूर करतील.कारण ते अक्षयला ओळखत असावेत, त्यांचा या खूनाशी संबंध आहे म्हणूनच ते लिहीत असावेत म्हणून त्यांची सुध्दा सखोल चौकशी करण्यात येईल.

