नांदुरा येथे तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळ्याचे अनावरण.
वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण.
मोमिनाबाद - दि.05/06/23
मोमिनाबाद तालुका नांदुरा येथे तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळ्याचे अनावरण वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष एड. सदानंद ब्राह्मणे, नांदुरा तालुकाध्यक्ष अजाबराव वाघोदे,धम्मप्रचारक शांताराम इंगळे, राजुभाऊ वाकोडे, विलास तायडे, लक्ष्मण वानखेडे, गणेश गायकवाड, यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.


