तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने बोंदार येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी.
मेहकर प्रतिनिधि - दि. 09/06/23
दि.०१ जुन २०२३ रोजी बोंदार हवेली ता. जि. नांदेड येथील अक्षय भालेराव भिमसैनिकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली? गावातील सनातनी जातीय वादी गाव गुंड्यांनी जातीय द्वेष भावनेतुन वन अक्षय भालेराव या तरुण युवकांची निघृणपणे हत्या केली. राष्ट्रीयत्वाची भावना व मानवता जयंतीच्या माध्यमातून अधोरेखीत केली जात असते. या श्रेष्ठ विचारांना पायदळी तुडवत अक्षय भालेरावाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील सर्व राजकिय पक्ष, सामाजिक संघटना तसेच समस्त आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट उसळली असुन या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करावी व याचा मुख्य सुत्रधाराचा शोध घेण्यात यावा. तसेच पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक यांची चौकशी करण्यात यावी. तसेच पिडीत कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावुन घ्यावे व त्या कुटुंबास ५० लाख रुपयाची आर्थिक मदत देवुन पिडीत कुटुंबास न्याय देण्यात यावा. या वर योग्य कार्यवाही न झाल्यास येणा-या काळात लोकशाही मार्गाने तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे निवेदनात नमुद करण्यात आले..
यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप भाऊ गवई ,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अंकुश राठोड,अख्तरभाई कुरेशी, राजकुमार ऊचित, गजानन सरकटे,प्रकाश सुखधाने,अनिल देबाजे,सचिन गवई,कुणाल माने,विजय सरकटे,राधेशाम खरात,युनुस शहा,विशाल बाजड,सतिश शेटाने,सुभाष बनसोडे,महेंद्र गवई ,अफ्ररोज अलि आदि तथागत ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
