अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा आंबेडकरी जनतेचे निवेदन
खामगाव - दि. 09/06/23
नांदेड बोढार येथे भीम जयंती काढली म्हणून आंबेडकरी तरुण अक्षय भालेराव यांचा झालेला खून अत्यन्त दुर्दैवी असून अक्षय याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देतांना फाशी झाली पाहिजे या मागणी साठी खामगाव तालुक्यातील आंबेडकरी जनतेने आज उपविभागीय अधिकारी खामगाव यांचेमार्फत महामहिम राज्यपाल यांचे नावे निवेदन दिले. दिलेल्या निवेदना नुसार
महाराष्ट्रात सातत्याने अनुसूचित जाती व विशेषतः बौद्ध आंबेडकरी जनतेवर हल्ले होत आहे. एवढ्यात लागोपाठ आंबेडकरी समाजावर हल्ले होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये भीमजयंती ची मिरवणूक काढली म्हणून बोढार जिल्हा नांदेड येथिल जातीयवाद्यांनी भीम सैनिक अक्षय भालेराव याची क्रूरपणे हत्या घडवून आणली. जातीयवादी व द्वेष्यातून हे हत्याकांड घडल्याचे संबंध आंबेडकरी जनतेची भावना आहे. या हल्ल्या मुळे संबंध आंबेडकरी समाज दुखावला आहे. जसजशी आंबेडकरी माणसे प्रगती करत आहेत तसतशी त्यांच्या विरुद्ध षडयंत्र केली जात आहेत.यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण लक्ष घालून राज्य शासनास योग्य ते आदेश द्यावेत असे नमूद करून
अक्षय भालेराव प्रकरणी खालील मागण्या केल्या आहेत.
1) शहीद अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
2)हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा.
3)भालेराव कुटुंबाला पूर्ण वेळ संरक्षण द्यावे
4)अक्षय भालेराव याच्या घरातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
5) पिडीत परिवारास शासकीय आर्थिक मदत विलंब न करता द्यावी
6)ऍट्रॉसिटी दखल होताच आरोपीची सर्व मालमत्ता जप्त करावी.
7)यापुढे आंबेडकरी समूहावर अन्याय अत्याचार होणार नाही याकरिता कडक उपाय योजना तयार कराव्यात.
निवेदन देतेवेळी जेष्ठ आंबेडकरी नेते व्ही. एम. भोजने, गौतम गवई,ऍड. अशोक इंगळे, ऍड. अविनाश इंगळे, विक्रम नितीनवरे, अतुल सिरसाट,ऍड.विश्वम्भर गवई,ऍड. अभिजित वानखडे, ऍड. अजाबराव भोजने, ऍड. अभय कुमार गवारगुरु, महादेव राव नाईक, अमित तायडे, प्रशांत तायडे, विजय बोदडे मनोज भोजने, दादाराव वाकोडे, व्ही. डी. वाकोडे, अर्पित वाकोडे, ए. आर. रनित, व्ही. बी. गवई, धम्मपाल गवई, उमेश सावदेकर, ए. डी. इंगळे, मोहम्मद नदीम, मो. सलीम शेख, गजानन हेरोडे .विजय गवई इत्यादी सह इतर आंबेडकरी समाज बांधव उपस्थित होते.
