हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तथागत ग्रुप पुणे जिल्ह्याच्या वतीने 150 झाडे लावण्याचा व पुढली पिडी वाचवा हा उपक्रम राबविण्यात आला.
पुणे प्रतिनिधि :- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई व पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश थिटे हातवे बू उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिमे अंतर्गत 150 हापुस आंब्याची झाडे हातवे बु येथिल प्रत्येक नागरिकांनच्या घराबाहेर लावण्यात आली व आपल्या घरी तयार करून एक नवा आदर्श निर्माण केला..
यावेळी, तथागत ग्रुप पुणे जिल्हा अध्यक्ष हातवे बु चे उपसंरपच निलेश थिटे, कासुडी गावचे मा.उपसंरपच राजु मालुसरे, तथागत गुपचे पुणे जि.सदस्य किशोर कांबळे, विलास राठोड,गणेश थोरात,भालेराव दाजी, सोप्निल गोगावले,डि एम मांगडे आदि PMC चे कर्मचारी व तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील पदाधिकारी व सदस्य यांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


