वंचित बहुजन आघाडीची मलकापूरला उद्या महत्वपूर्ण नियोजन बैठक.
मलकापूर प्रतिनिधि -
मलकापूर तालुक्यातील सर्व गायरान धारक, शासकीय महसूल जमिन अतिक्रमणधारक तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की *श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात दिनांक 20 जुलै 2023 रोजी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनावर गायरान अतिक्रमण धारकांचा व शासकीय महसूल जमीन अतिक्रमणधारकांचा भव्य राज्यव्यापी महामोर्चा* आयोजित करण्यात आला असून त्या मोर्चात बहुसंख्येने मलकापूर तालुक्यातील जनतेने सामील व्हावे यासाठी अतिशभाई खराटे, बुलढाणा जिल्हा महासचिव, भाऊराव उमाळे जी. संघटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे
तरी वरील नियोजन बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती...
*बैठक दिनांक:- 17 जुलै 2023*
*सोमवार, वेळ:-दुपारी १२ वाजता*
*स्थळ:- रेस्ट हाऊस, मलकापूर*
विनीत.......
*सुशील मोरे, मलकापूर तालुकाध्यक्ष*
वंचित बहुजन आघाडी
