लोकनेते अतिशभाई खराटे यांच्या वाढदिवसानिमित्त
"मोफत भव्य महा आरोग्य शिबिर".
आपणास निमंत्रित करण्यात येते की आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेते, वंचित, बहुजन, शेतकरी, कष्टकरी व तळागाळातील जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढा देणारे, युवकांचे प्रेरणास्थान, लोकनेते, वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव मा. अतिशभाई खराटे यांच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त *"मोफत भव्य महा आरोग्य शिबिर" व "अभिष्टचिंतन सोहळा"* आयोजित केला असून वरील कार्यक्रमास आपली प्रमुख उपस्थिती प्रार्थनीय आहे
*दिनांक : 4 जुलै 2023*
*मंगळवार- दुपारी 12 वाजता*
*ठिकाण:- महेश भवन, बुलडाणा रोड, मलकापूर*
महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपले परिचित, परिसरात असणाऱ्या जनतेला, कार्यकर्त्यांना स्वतः संपर्क करून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करावे, ही विनंती.
(टीप- कार्यक्रम वेळेवर सुरू होईल)
*विनीत:-वंचित बहुजन आघाडी, मलकापूर तालुका*

