वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेचा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवत निषेध ll - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Sunday, 30 July 2023

वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेचा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवत निषेध ll


 वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेचा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवत निषेध ll

 खामगाव प्रतिनिधी: दि.31-07-23

गेल्या काही दिवसांपासून  महापुरूषांवर वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे यांच्या खामगाव येथील सभे दरम्यान त्यांच्या विधानाचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले. 

खामगाव येथील सभा सोमावरी सायंकाळीं पार पडली.  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच साई बाबा यांच्यावर टीका करत संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले.यामुळे सर्वत्र त्यांचा निषेध केला जात आहे. कार्यक्रम स्थळी सोमवारी भिडेंविरोधात निदर्शने करण्यात आली. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक सोनोने ,पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, महासचिव अतिशभाई खराटे,तालुकाअध्यक्ष प्रभाकर वरखेडे, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव,  निवृत्ती मांजुळकर, सुशील मोरे, रवी मोरे, नितीन सूर्यवंशी, प्रकाश दांडगे, भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्ष दादाराव हेलोडे, रामेश्वर तायडे, अंबादास डोळे, रवी धुरंधर,सुमित वाकोडे, राहुल हेलोडे, विजय निंबाळकर, संदेश शेगोकार, यशवंत गवळी, संकेत गवळी,प्रमोद जावडेकर शुभम गवई, संजय मिसाळ, अमोल शेगोकार,चेतन वाकोडे, शुभम मोरे, आकाश बोर्डे, राज वानखडे,तुषार सरदार आदी सहभागी झाले होते. पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.