संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी विरुद्ध काँग्रेस पक्षाचे खामगाव येथे आंदोलन - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 31 July 2023

संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी विरुद्ध काँग्रेस पक्षाचे खामगाव येथे आंदोलन


 संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी विरुद्ध काँग्रेस पक्षाचे खामगाव येथे आंदोलन


खामगाव - सातत्याने महापुरुषंचा अवमान करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याची खामगाव येथिल सभा रद्द करावी व केलेल्या वक्तव्या विरुद्ध गुन्हा  दाखल करावा, यासाठी आज खामगाव येथे पोलीस स्टेशन समोरील गांधी पुतळ्या समोर आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी यांना अभिवादन करून  " महात्मा गांधी अमर रहे ", "छत्रपती शिवाजी महाराज की जय ज्योतिबा फुले अमर रहे " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करून संविधान जिंदाबाद, मणिपूर वाचवा  लोकशाही वाचवा, संभाजी भिडे मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ निदर्शने केल्यानंतर भिडे च्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी देऊ नये, त्याचा कार्यक्रम रद्द करावा यासाठी उपविभागीय अधिकारी खामगाव यांना निवेदन देण्यात आले.या आंदोलनात धनंजय देशमुख सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तेजेंद्र सिंग चव्हाण कार्याध्यक्ष सेवादल महाराष्ट्र प्रदेश,गौतम गवई सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, अजय तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, मोहम्मद वसीम सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग,  अमित तायडे यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष,मयूर हु्रसाड, आकाश जयस्वाल, सचिन जयस्वाल,विशाल दांडगे, मनोज बोदडे, राजू इखारे,डिगंबर पाटील, सौरभ रिचारिया, नितीन गावंडे, कैलास सिरसाट बहुजन टायगर संघटना, योगेश रायपुरे, मनोज तायडे, साहिल देशमुख, सोपान लाहुडकर, रमेश इंगळे,नसीम शाह, नितीन वाघ, श्रीकृष्ण गायकी, संतोष साळुंके, अजय सिरसाट, सागर इंगळे, विजय इंगळे, शुभम सिरसाट, सहदेव इंगळे  आकाश सोळके. शेख युसुफ. दौलत निंबाळकर. छोटू पाटील. सोमु सोनोने इत्यादी सह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.