लिंकचे कारण पुढे करत शेतकऱ्यांची अडवणूक
अखेर शिवसेनेमुळे तीन दिवसानंतर यूरिया मिळाला
प्रतिनिधि - अहेमद शेख /अकोट
अकोट - गेल्या तीन दिवसांपासून लिंक चे कारण पुढे करत येथील खरेदी विक्री संघातून शेतकऱ्यांना विना युरिया खाली हात परतावे लागत होते . शेतकऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ब्रम्हा पांडे यांना ही समस्या सांगताच त्यांनी खरेदी विक्रीत लगेच धाव घेतली .संबंधित यंत्रणेला जाब विचारताच अखेर शेतकऱ्यांना युरिया चे वितरण करण्यात आले .
तालुक्यात पावसाचे वातावरण आहे .अधून मधून पावसाचे ठोक बरसात असल्याने पिकांच्या आधिक वाढीसाठी अशा वातावरणात शेतकरी पिकांना युरिया खाता ची मात्रा देतात . गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी खरेदी विक्री संघात युरिया खत उपलब्ध असतांना नुसता चकरा मारत होते .मात्र खरेदी विक्री संघा कडून शेतकऱ्यांना लिंक न आल्याचे कारण सांगून त्यांना युरिया देणे टाळण्यात येत होते .त्यामुळे शेतकऱ्याना खाली हात गावाकडे परतावे लागत होते .आज सकाळ पासूनच शेतकऱ्यांची गर्दी या प्रांगणात जमली होती .शेतकऱ्यांचे खरेदी विक्री संघातील संबंधितांशी शाब्दिक वाद होत होते .त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ब्रम्हा पांडे यांना ही समस्या सांगितली .शिवसेना तालुका प्रमुख पांडे यांनी उपस्थित संचालक व कर्मचारी यांची युरिया वितरणाची समस्या जाणून घेतली .लिंक चे कारण पाहता जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांच्याशी ब्रम्हा पांडे यांनी संपर्क साधला .त्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक कीरवे यांनी युरिया खत वाटपाचे आदेश दिले .शेतकऱ्यांना प्रती माणशी दोन पोते युरिया देण्यात आला .खरेदी विक्री संघाच्या आवारात युरिया साठी गर्दी पाहता शिवसेना तालुका प्रमुख पांडे यांनी एका कृषी सेवा केंद्रात युरिया आल्याची माहिती मिळताच या कृषी सेवा केंद्रातून युरिया चे वितरण करण्यास संबंधित कृषी सेवा संचालक यांना सांगितले .त्यामुळे आज अकोट शहरात युरिया साठी आलेल्या शेतकऱ्यांना खरेदी विक्री संघ व एका कृषी सेवा केंद्रातून युरिया चे वाटप करण्यात आले .केवळ शिवसेने ने शेतकऱ्यांची दखल घेतल्याने शेतकऱ्यांना युरिया खाताबाबत दिलासा मिळाला अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या .या वेळी शिवसेने चे सर्कल प्रमुख नंदू कुलट ,संजय देवळे , खरेदी विक्री चे संचालक राजेश पुंडकर व शेकडो शेतकरी उपस्थित होते .
