*रब्बी पिकाकरिता दोन महिने 24 तास वीज द्या* *अनिल वाकोडे जिल्हाध्यक्ष वंचीत बहुजन युवक आघाडी बुलढाणा* - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Tuesday, 21 November 2023

*रब्बी पिकाकरिता दोन महिने 24 तास वीज द्या* *अनिल वाकोडे जिल्हाध्यक्ष वंचीत बहुजन युवक आघाडी बुलढाणा*


 *रब्बी पिकाकरिता दोन महिने  24 तास वीज द्या* *अनिल वाकोडे जिल्हाध्यक्ष वंचीत बहुजन युवक आघाडी बुलढाणा*

 शेगाव प्रतिनिधि - दि.21/11/2023 .

शेगांव -  सहायक अभियंता वीज वितरण कंपनी शेगाव यांना वंचीत बहुजन युवक आघाडीच्या वतीने निवेदन सादर केले आहे.सदर  निवेदनात नमूद केले आहे कि यावर्षी अतिवृष्टी झाली असल्यामुळे शेतकऱ्याचे हाता तोंडाशी आलेले  खरिपातील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेगाव तालुक्यातील शेतकरी हा आर्थिक संकटात  सापडलेला आहे त्यामुळे त्याला  या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी रब्बी पीक हा एक पर्याय आहे परंतु  त्यांना नियमित योग्य दाबाची वीज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचे पीक धोक्यात येत आहे त्यामुळे येत्या दोन महिन्यापर्यंत 24तास वीज देण्यात यावी तसेच रब्बी पीक निघेपर्यंत थकीत कृषिपंप धारकांचा वीजपुरवठा खंडित करू नये असे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी वंचीत बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे,  राजाभाऊ भोजने जि. प. सदस्य, दादाराव अंभोरे तालुकाध्यक्ष,सोपान लाजुळकर, मनोहर सनगाळे, शेख नासिर शेख गफूर सरपंच, गौतम इंगळे उपसरपंच, दीपक विरघट, बोधीसत्व गवई, संतोष भेंडे, मोहन पाटील, शैलेश इंगळे , ब्रह्मदेव फुलकर, गौतम इंगळे पत्रकार, यांचे सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.