*मुंबई येथे 25 नोव्हेंबर रोजी आयोजित संविधान सन्मान महासभेची वंचित बहुजन आघाडी (उत्तर) बुलढाणा जिल्हा द्वारा नियोजनात्मक बैठक संपन्न*
खामगाव प्रतिनिधि -
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात मुंबई येथे दि. 25 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित "संविधान सन्मान महारॅली व महासभेत" सहभागी होण्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन (उत्तर) बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने खामगाव येथे दि.18 नोव्हेंबर रोजी नियोजनात्मक बैठक पार पडली या रॅलीत बुलढाणा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तथा समस्त संविधान प्रेमी व संविधान बचाव मोहिमेत सक्रिय कार्य करणाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले
याप्रसंगी नियोजन बैठकीचे निमंत्रक जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग, युवक जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वाकोडे,जि. संघटक भाऊराव उमाळे, जि.उपाध्यक्षा प्रीतीताई शेगोकार, पार्वताताई इंगळे, सुमनताई थाटे, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, बा.स.सदस्य राजेश हेलोडे, जि.सदस्य मनोहर सनगाळे, चंद्रभान कळंबे, जि.उपाध्यक्ष विजयभाऊ तायडे,जि.संघटक अरुण पारवे, जी.उपाध्यक्ष एड.सदानंद ब्राह्मणे, जी.संघटक वसंतराव तायडे, जी.उपाध्यक्ष मनोहर जाधव, श्रीकृष्ण पहुरकर, जि.प्रवक्ता एड. रवींद्र भोजने, जि.उसंघटकक्ष भगवान इंगळे, प्रमोद इंगळे, पहुरकर, रवींद्र गुरव, सम्यक आंदोलन जि. सचिव राज वानखेडे, मलकापूर तालुकाध्यक्ष सुशील मोरे, खामगाव तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, महासचिव नरेंद्र तायडे मलकापूर युवा तालुकाध्यक्ष भारत झाल्टे, महासचिव अजय इंगळे, युवा तालुकाध्यक्ष शेगाव अर्जुन शेगोकार, शहराध्यक्ष संदेश शेगोकार, तुकाराम रोकडे, सलीम भाई मंडपवाले, गिरीश उमाळे, दीपक विरघट, गणेश सावळे, जी. सदस्य ताराबाई तायडे, शेगाव महिला तालुकाध्यक्ष संगीता गवारगुरु, शहराध्यक्ष संगीताताई ससाने, अनिता सावंत, मलकापूर महिला नेत्या संगीता सावळे, सुजाता हिवराळे, डॉ.ए. तायडे ,चंद्रकांत तेरे दीपक महाजन अजय निंबाळकर, नरेंद्र वाकोडे, मिलिंद इंगळे ,गौतम इंगळे, सुमेध सावंग, संतोष मैदरे आदी जिल्हा तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते.

