संविधान सन्मान महासभेस जाहिर पाठिंबा व सक्रिय सहभाग : तथागत ग्रुप म.रा संघटना.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीपभाऊ गवई व कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश संघटक विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सुरेश मोहिते साहेब महाराष्ट्र सरचिटणीस वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांना दि.२५/११/२०२३ रोजी शिवाजीपार्क, मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे आदरणीय ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान सन्मान महासभेचे आयोजन केले आहे, संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित अश्या अभूतपूर्व महासभेस "तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आम्ही जाहिर पाठिंबा देत आहोत. तसेच या महासभेत संविधानाच्या सन्मानार्थ आमचे कार्यकर्ते, सभासद मोठया प्रमाणात सहभागी होणार आहोत.
