प्रशांत डोंगरदिवे यांना राज्यस्तरीय "अनाथाचा आधार सन्मान गौरव पुरस्कार" जाहीर - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 24 November 2023

प्रशांत डोंगरदिवे यांना राज्यस्तरीय "अनाथाचा आधार सन्मान गौरव पुरस्कार" जाहीर


 प्रशांत डोंगरदिवे यांना राज्यस्तरीय "अनाथाचा आधार सन्मान गौरव पुरस्कार" जाहीर

चिखली : चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांना तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाद्वारे व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय "अनाथाचा आधार सन्मान गौरव पुरस्कार" जाहीर झाला असून सदर पुरस्कार सोहळा दि ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सिल्लोड येथे संपन्न होणार आहे. 

चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांनी बहुजन चळवळीच्या माध्यमातून दिलेले योगदान व आज संस्थेच्या माध्यमातून बेवारस निराधार वयोवृद्ध महिला पुरुष यांचा तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात सांभाळ करीत आहे तसेच विधवा घटस्फोटीत परितक्ता अशा निराधार महिलांना सुलोचना महिला आश्रम सुरु करून त्या महिलांची सर्वच जबाबदारी स्वीकारली आहे, तसेच गरजू महिलांना मोफत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रामाणिक पर्यन्त करीत ऋणानुबंध वधू वर सूचक केंद्र द्वारे लग्न संबंध जुळवणे व शासनाची कन्या दान योजना राबवित सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून अनेक गोर गरीब वधू वरास शासकीय अनुदान मिळवून दिले आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान व आपले ज्ञानपंख वृतपत्र आयोजित राज्यस्तरीय गौरव ज्ञानपंखगौरव पुरस्कार सोहळ्यात प्रशांत डोंगरदिवे यांना "अनाथाचा आधार सन्मान गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्कार बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.