महिलांसाठी स्वच्छतागृह व पिण्याचे पाणी तसेच इतर सुविधांसाठी "जनशक्ती शेतकरी संघटनेचे" एस.बी.आय . शाखा चिखली ला निवेदन राजेन्द्रजी लहाने
सुविधा उपलब्ध करून न दिल्यास लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन चा इशारा...... राजेंद्र लहाने
चिखली :- सामाजिक बांधिलकी, राजकीय विचार मंच, "जनशक्ती शेतकरी संघटना " महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी लहाने यांनी "भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया" शाखा चिखली यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनामध्ये विनंती करण्यात आली आहे की, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चिखली येथे महिलासाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच आपल्या शाखेमधील ज्या वयोवृद्ध महिला विशेष करून ग्रामीण भागातील खातेदार आहेत त्या महिलांना आपल्या कर्मचाऱ्याकडून योग्य ती वागणूक मिळत नसल्याचे लक्षात आले आहे. जवळपास सर्व महिला या शेतकरी असून बाहेर गावच्या असल्यामुळे त्यांना कमी शिक्षण असते ते अडाणी आहेत. त्यांना आजची डिजिटल, ऑनलाइन झालेली बँक त्यांना अजून व्यवस्थित समजत नाही त्यामुळे त्यांना आपल्या कर्मचारी वर्गांना समजून तसेच लक्षात आणून देणे ही आपली जबाबदारी आहे. आपण आपल्या स्तरावरून योग्य ती समज देण्यात यावी अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच क्रमांक आठ या टेबलवर नेहमीच गर्दी असल्यामुळे केवायसी आधार लिंक व मोबाईल आधार लिंक सकाळु 11 ते दुपारी 12 हे कामकाज होत असल्यामुळे त्याचा वेळ सकाळी 11 ते सायं 4 करण्यात यावे .असे सुद्धा नमूद करण्यात आलेले आहे. वरील दिलेल्या विषयास कारवाई न केल्यास आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात येईल शेवटी अशा इशाराही बुलढाणा जिल्हा अध्यक्ष " जनशक्ती शेतकरी संघटना महाराष्ट्र" राजेंद्र लहाने यांनी दिला आहे. यावेळी राजेंद्रजी लहाने पत्रकार सुनिल अंभोरे आकाश काळे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
