तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार मा.अमोल रामकृष्ण मिटकरी साहेब यांची अकोला येथे सदिच्छा भेट..
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिप भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला विश्रामगृह येथे कामगार विभाग अकोला जिल्हा कार्य कारणी गठित करण्यात आली व पुढील दोन दिवशीय विचारमंथन शिबिराचे आयोजन मेहकर मध्ये करण्यात येणार असता मा.संदिप भाऊ गवई हे अकोला येथे एक दिवसीय दौर्यावर असता फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना मानणारे एक महाराष्ट्रातील वक्ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार मा.अमोल रामकृष्ण मिटकरी साहेब यांची अकोला येथे सदिच्छा भेट घेण्यात आली व तथागत ग्रुप विषयी चर्चा करण्यात आली यावेळी साहेबांनी अकोला पदाधिकारी यांना भक्कम पणे साथ देऊ असे आश्वासन दिले यावेळी तथागत ग्रुपच्या वतीने आभार व्यक्त केले
यावेळी,तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक मा.संदिप भाऊ गवई, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख मा.सुनिल वनारे, कामगार विभाग अकोला जिल्हा अध्यक्ष मा.गणेश निळे,कामगार विभाग अकोला जिल्हा उपाध्यक्ष मा.मधुकर बुंदे ,कामगार विभाग अकोला जिल्हा सचिव मा.गजानन गोजे,कामगार विभाग अकोला शहर अध्यक्ष मा.अजय उपरवट आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते..
