मेहकर येथे होणार तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे व समता पक्षाचे दोन दिवसीय शिबिर
अकोला जिल्ह्यातील शासकीय विश्राम गृह येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे व समता पक्षाचे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार असुन सर्व सहकारी, फ्रंटल व सेलचे पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष व पक्षाचे व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या शिबिरास उपस्थित राहतील, अशी माहिती समता पक्षाचे नेते तथागत ग्रुपचे मार्गदर्शक संस्थापक संदिप भाऊ गवई यांनी दिली. जानेवारी महिन्यापासून लोकसभा निवडणुकीचे वेध लागण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मा.संदिप भाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका पक्षाच्या सहकाऱ्यांसह राजकीय भूमिकेवर विचारमंथन शिबिरात होईल. भविष्यातील आव्हानांना समोरे जाण्याच्या दृष्टीकोनातून हे विचारमंथन शिबिर अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास संदिप भाऊ गवई यांनी व्यक्त केला.
यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक मा.संदिप भाऊ गवई, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख मा.सुनिल वनारे, कामगार विभाग अकोला जिल्हा अध्यक्ष मा.गणेश निळे,कामगार विभाग अकोला जिल्हा उपाध्यक्ष मा.मधुकर बुंदे ,कामगार विभाग अकोला जिल्हा सचिव मा.गजानन गोजे,कामगार विभाग अकोला शहर अध्यक्ष मा.अजय उपरवट आदी तथागत ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
