महात्मा गांधी यांचा लढा सर्व मानव समूहाला प्रेरणा देणारा
अभयसिंग मारोडे यांचे प्रतिपादन
"अहिंसा उत्सव " कार्यक्रमाचे उदघाटन खामगाव येथे सपन्न
खामगाव - महात्मा गांधी यांची शिकवण माणसाला प्रेम, मैत्री व करुणा शिकवते. हेच अनमोल विचार देशाला देऊन गांधीजी यांनी प्रत्येक जाती धर्मातील माणूस हा माणसाशी जोडला. त्यांच्या प्रत्येक लढ्यातून ऐकतेचा व सामानतेचा संदेश मिळतो म्हणून महात्मा गांधी यांचा लढा मानवी समूहाला प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते अभयसिंग मारोडे यांनी केले. ते अहिंसा उत्सव कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, उदघाटक काँग्रेस सेवादल प्रदेश कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान , मुख्य संयोजक तथा सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अजय भाऊ तायडे, जेष्ठ नेते व्ही. एम. भोजने, अतुल सिरसाट जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस, छत्रपती फाउंडेशन चे स्वप्नील ठाकरे, जेष्ठ नेते प्रल्हादकाका सातव इत्यादी उपस्थित होते. " अहिंसा के रास्ते "या कार्यक्रमाला 6 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारावर आधारित लोकसंवाद व व्याख्यान कार्यक्रमा चा सप्ताह आज पासून खामगाव तालुक्यात सुरु झाला आहे. त्याचे उदघाटन आज गौतम गवई यांच्या बिलोवी प्रकल्प शिरसगाव देशमुख शिवार चिखली रोड येथे पार पडले.
यावेळी बोलतांना अभयसिंग मारोडे यांनी गांधीजीं च्या जीवनातील निवडक घटनाचे दाखले दिले. ते म्हणाले जातीयवाद हा गांधींना कधीच मान्य नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेली अस्पृश्य निवारणाची चळवळ समजून घेत 1938 मध्ये स्वतः उपोषणास बसले, दलितांना अधिकार व हक्क मिळालेच पाहिजे ही त्यांची मागणी होती. मात्र, स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या महापुरुषाची बदनामी केली जाते. स्वातंत्र्य लढ्यात कवडीचेही योगदान नसलेल्या गोळवलकर व हेडगेवार यांना मोदी सरकारच्या काळात खूप महत्व दिले जात आहे, मात्र, गांधीजी ना संघांचे पोसलेले लोक कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुत्ववादी विचारांनी गांधीजी यांना कितीही कमी लेखले तरी गांधी 185 देशात पोहोचले आहेत. जिथे फक्त बुद्धच पोहोचले आहेत. राम मंदिर सोहळ्यात मोदी यांना अवास्तव महत्व दिले गेले असे सांगून माणसाचा खरा विकास हा पुस्तकं वाचनाने होणार आहे, म्हणून महापुरुष वाचले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि गांधी यांचे कधीही मतभेद नव्हते. तसेच गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एकमेकांना आदरानेच बघत यासंदर्भात अनेक उदाहरणे मारोडे यांनी दिली. भगतसिंग यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी गांधी यांनी 6 पत्रे लिहिली अशा अनेक घटना आहेत ज्यामधून महात्मा गांधी यांचे कार्य राष्ट्राला प्रेरणादायी ठरले अशा शब्दात अभयसिंग मारोडे यांनी गौरव केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम गवई, उदघाटक तेजेंद्रसिंह चौहान व संयोजक अजय तायडे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले त्यानंतर महापुरुषाचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक अजय तायडे यांनी केले व सूत्रसंचालन अंबादास वानखडे माजी उपसभापती पस खामगाव यांनी केले तर आभार प्रकाश इंगळे यांनी मानले.. कार्यक्रमाला मो. वासिमोद्धीन सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, माजी प्राचार्य आनंदराव वानखडे, माजी सरपंच श्रीकृष्ण मोरे, अमित तायडे जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड., सोपान लाहुडकर.मनोज बोदडे, रमेश हिवराळे, मिलिंद हिवराळे, मधुकर वेरुळकर.जोगेंद्र हिवराळे, सहदेव इंगळे, दिपक खंडेराव. अभिजित राठोड. सौरभ रीचारिया. सचिन तायडे. विजय वाघ. वैभव धुरंधर. प्रशांत केनेकर. प्रशांत सावग. महेंद्र दामोधर.

