निराधार महिलेला दोन मुलासह मिळाला वृद्धाश्रमात आश्रय - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 22 January 2024

निराधार महिलेला दोन मुलासह मिळाला वृद्धाश्रमात आश्रय


 *निराधार महिलेला दोन मुलासह मिळाला वृद्धाश्रमात आश्रय*

चिखली :- ऋणानुबंध समाज विकास संस्था द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे बेवारस बेघर निराधार वयोवृद्ध आजी आजोबांना निःस्वार्थ पणे सर्व प्रकारे मोफत सेवा देण सुरु आहे. समाजात ज्यांनी जन्म देऊन हे सुदंर जग दाखवील आज त्या आई वडिलांना सांभाळन्यास लोक टाळाटाळ करीत आहे म्हणून समाज सेवकांनी वृद्धाश्रम सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महिलांवर होत असलेले अन्याय अत्याचार मोठया प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे समाजातिल पीडित महिला आई वडील नाही कोणतेही नातेवाईक सांभाळ करू शकत नाही पतीच्या अन्याय अत्याचार सहन होत नाही त्यामुळे मुलाबलांचा प्रश्न चव्हाट्यावर येतोय म्हणून संस्था द्वारा सुलोचना महिला आश्रम सुरु करण्यात आले आहे या महिला आश्रम मध्ये विधवा, घटस्फोटीत, परितक्ता, पती, सासू सासरे यांच्या पासून होणारे अन्याय अत्याचार पीडित महिलांसोबत त्यांच्या मुलांना सुद्धा चांगले संस्कार व शिक्षण मिळावे यासाठी या महिला आश्रम ची स्थापना करण्यात आली आहे.

त्याच अनुषंगाने चिखली तालुक्यातील एक पीडित महिला तिला फिट चा आजार असून तिला एकूण सहा अपत्य आहेत चार अपत्य हे पती जवळ असून आजरोजी दोन सोबत आहे हि महिला दोन महिन्याची गरोदर असतांना तिला तिच्या पतिने दारूच्या व्यसणामुळे अतोनात नरक यातना देऊन घराबाहेर काढून दिले. म्हणून ती माहेरी आली परंतु तिच्या सख्या भावाने सुद्धा सांभाळण्यास नकार दिला त्यामुळे तिच्या आईने तिला मामाच्या घरी नेले त्यानंतर अनेक वेळा तिच्या सासरी पाहुणे व गावातील पंच सोबत नेऊन सुद्धा तिच्या पती व सासू ने तिचा स्वीकार केला नाही उलट तिलाच आर्वांच्य भाषेत शिवीगाळ करून माझे चार मुलं माझ्याजवळ आहे हे दोन मुलं माझे नाही कोणाचे आहे त्यांच्याकडे जा असे म्हणून तिच्या चारित्र्या वर शिंतोडे उचलत तिला सर्व पंच कमेटी समोर अपमानित केले.तिने दोन तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिचे व तिच्या भावजई चे पटत नसल्याने तिचा सख्खा भाऊ सुद्धा सांभाळू शकत नाही. परंतु तीच्या भावाला तुकाराम आश्रय वृद्धाश्रम ची माहिती मिळताच संपर्क साधला परंतु ती गरोदर असल्यामुळे तिला आश्रम मध्ये सुद्धा सांभाळणं शक्य नव्हते म्हणून तिची प्रसूती झाल्यावर तिचे एक दिड महिन्याचे बाळ व एक दोन अडीच वर्षाच बाळ सह तिला कायदेशीर बाबी पूर्ण करून अखेर त्या पीडित महिलेला ऍड राजीव जाधव,भाई सिद्धार्थ पैठणे, पत्रकार अप्पू खान व सामाजिक कार्यकर्त्यां सौं रंजना जाधव यांच्या माध्यमातून तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात आश्रय देण्यात आला. त्या पीडित महिला व तिच्या दोन्ही मुलांची आश्रम च्या वतीने पालन पोषणासह सर्व जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच अश्या निराधार विधवा घटस्फोटीत पती च्या व सासरच्या मंडळीने त्रस्त पीडित महिला व बेवारस निराधार वयोवृद्ध कोठे हि आढळून आल्यास तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे संपर्क करावा असे आवाहन संस्थे च्या वतीने प्रशांत डोंगरदिवे यांनी केले आहे.