*सत्तेपासून वंचित राहिलेल्या समूहाला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच सत्तेमध्ये नेऊ शकतात*...
*विशाखाताई सावंग*..
कंझारा -
वंचित बहुजन महिला आघाडी ग्रामशाखा कंझारा उद्घाटन सोहळा माता रमाईच्या जयंती निमित्त ठेवण्यात आलेला होता वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर दमदार कामगिरी सुरू आहे. गावागावात शाखा निर्माण करून महिलांना एकत्र करण्याचे कार्य सतत सुरू आहे.श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी विशाखाताई सावंग वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने गावागावात भ्रमंती करून महिलांची जागृती करीत आहेत. पक्षाची कोणतीही पार्श्वभूमी किंवा कोणाचेही पाठबळ नसताना जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यापासून त्यांनी स्वतःला पक्षाच्या कामात झोकून दिलेले आहे. घरादाराची वा स्वतःची परवा न करता रात्रंदिवस झटून आपल्या पदाला कसा न्याय देता येईल एवढेच धोरण त्यांनी अवलंबिले आहे. त्यासाठी सातत्याने मोर्चा, आंदोलने, सामाजिक कार्य व सामाजिक उपक्रम , धार्मिक कार्य यामध्ये सक्रियपणे भाग घेऊन आणि जिल्ह्यातील महिलांना आपल्या समवेत घेऊन त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. यापूर्वी महिला आघाडी एवढ्या जोमाने कार्य करताना कधीच दिसली नाही. आपल्या कार्याचा भाग म्हणूनच कंजारा या गावांमध्ये ग्राम शाखा फलकाचे भव्य अनावरण प्रसंगी विशाखाताई सावंग यांचे महिलांनी जंगी लेझीम ढोल ताशे व फटाके फोडून न भूतो न भविष्यती असे स्वागत केले. खरोखरच त्यांच्या कार्याची ती पोच पावतीच ठरेल यात मुळीच शंका नाही.
एखाद्या राजकीय व्यक्तीचे अशा प्रकारचे स्वागत होताना बहुधा फारसे आढळत नाही. त्यासाठी तन-मन-धनाने कार्य केले तरच महिलांचे संघटन जुडते .हे त्यांनी आपल्या कार्यशैलीतून सिद्ध केले. आज त्यांच्या एका हाकेला ओ देऊन शेकडो महिला घरातून पक्षाच्या कार्यासाठी बाहेर पडतात. खरं म्हणजे पक्षाच्या कार्यासाठी महिलांना एकत्र आणणे फारच कठीण काम आहे. बहुदा महिला घराबाहेर पडतच नाही असाच सर्वांचा अनुभव आहे. उद्घाटन प्रसंगी त्यांनी महिलांना लोकशाही वाचवण्यासाठी आवाहन केले. तसेच ग्रामशाखेचे कार्य सुद्धा स्पष्ट केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नेते प्रा.अनिल अमलकार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी सुद्धा आपल्या मनोगतात महिलांनी जोमाने कार्य करावे असे आवाहन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सर्व ग्राम शाखा महिला यांनी सुंदर अशा कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. यावेळी अजबराव भोजने जिल्हा सचिव सुमनबाई थाटे जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष संगीता गवार ग्रुप तालुका उपाध्यक्ष इंदुबाई वानखेडे करुणा लांडगे ग्रामशाखा अध्यक्ष कुसुम शेगोकार ग्रामशाखा सचिव कांता लांडगे नंदा लांडगे सूर्यकांता लांडगे सुनिता इंगळे अनिता इंगळे कांता इंगळे अर्चना इंगळे पार्वता शेगोकार कांता तायडे निर्मला इंगळे संगीता इंगळे आम्रपाली तायडे शीला लांडगे गीता लांडगे चंदा लांडगे शीला इंगळे अंजना लांडगे सुमन लांडगे प्रमिला लांडगे सीमा इंगळे वनिता सोनवणे वैशाली लांडगे ज्योती लांडगे अलका लांडगे वनमाला लांडगे रूपाली लांडगे अनिता लांडगे कांता लांडगे सीमा लांडगे संगीता इंगळे सुनंदा नितोने इंदुबाई इंगळे व संख्या महिला व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितोने साहेबांनी उत्कृष्ट प्रकारे केले.

