*मलकापूर येथे लवकरच सभा*
*ॲड. बाळासाहेब आंबेडकराची अतिशभाई खराटे व पदाधिकाऱ्यांशी भेटी प्रसंगी चर्चा*
मलकापूर - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची यशवंत भवन अकोला येथे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांचे नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली
याप्रसंगी ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मलकापूर जि. बुलढाणा येथे जाहिर सभा होणे बाबत चर्चा करण्यात आली
या दरम्यान ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मलकापूर येथे सभेबाबत सकारात्मक चर्चा करून लवकरच तारीख देण्याचे सांगितले
यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत
या अनुषंगाने लवकरच मलकापुर येथे बाळासाहेब आंबेडकर यांची वैचारिक तोफ धडाडणार असून ही परिवर्तनाची नांदी ठरणार आहे
या भेटीप्रसगी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष एस.एस.वले सर यांच्यासह वंचितचे मलकापूर तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राजुभाऊ शेगोकार, ता.नेते अजयभाऊ सावळे, ता.सचिव गणेश सावळे उपस्थित होते.

