*जवळा बु. (ता.शेगाव) येथे 'एल्गार परिवर्तन मेळाव्या'च्या माध्यमातून रविकांतभाऊ तुपकरांनी नागरिकांशी संवाद साधला.*
*जवळा बु. (ता.शेगाव) येथे 'एल्गार परिवर्तन मेळाव्या'च्या माध्यमातून रविकांतभाऊ तुपकरांनी नागरिकांशी संवाद साधला.* या मेळाव्याला परिसरातील गावकऱ्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. तर जवळा बु. वासियांनी गावातून मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले. 'एल्गार परिवर्तन मेळाव्यां'ना दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चालला आहे. शेतकरी, महिला व तरुणवर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी गावकरी प्रेमाने आपुलकीने स्वागत करीत. त्यांच्या प्रेमाला, विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही. कष्टकरी बांधवांसाठी लढा व संघर्ष अविरत सुरू राहिल, अश्या भावना यावेळी रविकांतभाऊ तुपकर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी श्याम अवथळे, रवी महानकर,श्रीकृष्ण काकडे, राजू पाटील, ज्ञानदेव पाटील, दीपक देशमुख, शिवा म्हळसणे, दिनकर म्हळसणे, दीपक खोंड, अतिष पळसकर, दीपक पाटील-अढाव, अस्लम शेख, प्रमोद म्हळसणे, विठ्ठल महाले, दत्तात्रय जेऊघाले, शिरू पाटील, रितेश म्हळसणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

